राजकीय
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मध्यरात्री पूरग्रस्त भागांची पाहणी
By nisha patil - 8/21/2025 11:26:32 AM
Share This News:
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मध्यरात्री पूरग्रस्त भागांची पाहणी
पूरस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सतर्क, अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी
कोल्हापूर :जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी रात्री ११ वाजल्यापासून कोल्हापूर शहर, कोल्हापूर–पन्हाळा महामार्ग तसेच आंबेवाडी व चिखली गावांमध्ये पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची सूचना दिली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मध्यरात्री पूरग्रस्त भागांची पाहणी
|