बातम्या

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

District Collector Amol Yedge1


By Administrator - 4/4/2026 1:24:51 PM
Share This News:



जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि प्रखर विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ मालवला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या देदिप्यमान इतिहासाला पुराव्यानिशी जगासमोर मांडण्याचे अत्यंत मोलाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. डॉ. पवार केवळ एक इतिहासकार नव्हते, तर ते सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक होते.

विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील 'राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट' (शाहू स्मारक ट्रस्ट) साठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. ट्रस्टच्या विविध उपक्रमांत आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले. शाहू स्मारकाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने प्रशासनाचा एक हक्काचा मार्गदर्शक हरपला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी संशोधकांची एक मोठी पिढी घडवली असून त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Total Views: 155