ताज्या बातम्या
नशामुक्त कोल्हापूरसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By nisha patil - 9/16/2025 10:54:57 AM
Share This News:
कोल्हापूर-: ‘नशामुक्त कोल्हापूर’ हा संकल्प घेऊन जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत प्रत्येक जिल्हावासीयाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यामध्ये नशामुक्ती शपथ, व्याख्याने, रन, सायकल रॅली, समुपदेशन शिबिरे, पथनाट्ये व प्रभातफेऱ्या अशा उपक्रमांचा समावेश आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज घडवावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नशामुक्त कोल्हापूरसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
|