बातम्या
ऊसतोड कामगारांसाठी सुविधा तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By nisha patil - 11/14/2025 4:38:00 PM
Share This News:
ऊसतोड कामगारांसाठी सुविधा तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. १४ : ऊसतोड कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व साखर कारखान्यांची तपासणी विशेष पथकांकडून करण्यात येणार आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय बैठकीत दिले.
या बैठकीत कामगारांना मिळणाऱ्या शासकीय योजना, ० ते ६ वयोगटातील मुलांच्या सुविधा, गरोदर मातांची काळजी, रुग्णवाहिका, शिक्षण, स्वच्छ पाणी, शौचालये, प्रकाशयोजना, लैंगिक शोषणाविरुद्ध समितीचे कामकाज, तसेच जनावरांसाठी लसीकरण आदी मुद्द्यांवर तात्काळ माहिती सादर करण्यास सांगण्यात आले.
कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणांचे नकाशे तयार करणे, महिला अत्याचार प्रतिबंधक समित्या सक्रिय ठेवणे, बालसंस्कार गृहांची स्थापना, व कोणतेही मूल शाळेबाहेर राहू नये याची जबाबदारी शिक्षण विभागाने घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.
कारखान्यांनी नवकल्पना राबवून सुविधा सुधाराव्यात; आवश्यक सुविधा न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अपघात विमा योजनेसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचेही आदेश देण्यात आले.
ऊसतोड कामगारांसाठी सुविधा तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
|