विशेष बातम्या
जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
By nisha patil - 11/25/2025 5:03:25 PM
Share This News:
जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
कोल्हापूर, दि. 25 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम राबविण्यात येतो. तथापि राज्यात नगरपालिका/ नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लावलेला असल्याने 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यामुळे 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
|