बातम्या

13 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन

District level award ceremony for ideal institution heads


By nisha patil - 12/9/2026 3:29:35 PM
Share This News:



13 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन

कोल्हापूर दि. 12 : कोल्हापूर जिल्हा/शहर शिक्षक लोकशाही आघाडी तसेच कोल्हापूर जिल्हा/शहर माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दि. 13 सप्टेंबर, 2026 रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे सकाळी ठीक 11.30 वा. आयोजित केला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास राज्यसभा सदस्य मा. खासदार धनंजय महाडिक आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जी. के. थोरात भूषविणार आहेत.

तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समिती अध्यक्ष मा. डॉ. श्रीराम शरदचंद्र साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेश सचिव मा. श्री. के. एस. ठोमसे, पुणे विभाग माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश खोत, राज्य (TDF) मार्गदर्शक मा. श्री. बी. डी. पाटील, पुणे विभाग (TDF) अध्यक्ष मा. श्री. शिवाजी कामथे, राज्य समन्वयक (TDF) मा. श्री. बी. एस. खामकर, कोल्हापूर महानगर (TDF) अध्यक्ष मा. श्री. संजय चोरमारे, कोल्हापूर जिल्हा (TDF) अध्यक्ष मा. श्री. राहुल कुंभार तसेच को. जि. मा. शि. संघाचे अध्यक्ष मा. श्री. अशोक पलंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यास शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा/शहर शिक्षक लोकशाही आघाडी व कोल्हापूर जिल्हा/शहर माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्थळ : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, कोल्हापूर

दिनांक : रविवार, १३ सप्टेंबर, २०२६     वेळ : सकाळी ११.३० वाजता


13 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन
Total Views: 52