विशेष बातम्या
श्रीपतराव बोंद्रे (दादा) जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 9/12/2025 2:55:42 PM
Share This News:
श्रीपतराव बोंद्रे (दादा) जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जयंतीनिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले आहे.
कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. पहिल्या चार क्रमांकांना रोख बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रके महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धा 22 डिसेंबर रोजी शहाजी महाविद्यालयात होणार आहेत. निबंध लेखन स्पर्धेतील स्पर्धकांनी आपले निबंध 24 डिसेंबर पर्यंत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाकडे पाठवायचे आहेत.
कनिष्ठ विभाग वक्तृत्व स्पर्धा विषय - श्रीपतराव बोंद्रे (दादा) :एक आदर्श व्यक्तिमत्व, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज, पर्यावरण वाचवा - भविष्य वाचवा, संविधान आणि भारतीय लोकशाही, अभिजात मराठी भाषा:संधी आणि आव्हाने
वरिष्ठ विभाग वक्तृत्व स्पर्धा विषय - श्रीपतराव बोंद्रे ( दादा) : राजकारण व समाजकारणातील नैतिकतेचा आदर्श, समाज माध्यमांच्या विळख्यात तरुणाई, संविधान आपला अभिमान , डिजिटल युग आणि वाचन संस्कृती, सायबर सुरक्षा: डिजिटल युगातील एक आव्हान,
कनिष्ठ विभाग निबंध लेखन स्पर्धा विषय : श्रीपतराव बोंद्रे ( दादा ) :एक आदर्श व्यक्तिमत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता :नव्या युगाचे तंत्रज्ञान, आजचा विद्यार्थी : शिस्त व मूल्ये, भारतीय संविधान: जगण्याचा मूलाधार, नवीन शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने,
वरिष्ठ विभाग निबंध लेखन स्पर्धा विषय - श्रीपतराव बोंद्रे (दादा) :बहुआयामी व्यक्तिमत्व ,कृत्रिम बुद्धिमत्ता : समाजातील बदलाचा वेग, आजचा युवक आणि समाज माध्यमे,सामाजिक न्यायाचे जनक: राजर्षी शाहू छत्रपती महाराज, संविधानाचा अमृत महोत्सव, नवीन शैक्षणिक धोरण संधी आणि आव्हाने.
निबंध व वक्तृत्व स्पर्धांसाठी प्रत्येकी प्रवेश फी 50 रुपये असून विद्यार्थ्यानी आपले निबंध श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर येथे पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीपतराव बोंद्रे (दादा) जयंती दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
|