बातम्या
येत्या शुक्रवारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
By Administrator - 12/16/2025 5:37:29 PM
Share This News:
येत्या शुक्रवारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
कोल्हापूर दि. 16 जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी पोलीस परेड ग्राउंडü येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या साधना कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील अंध, बौद्धिक अक्षम, कर्णबधिर व मूकबधिर अशा दिव्यांग प्रवर्ग शाळेतील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये 50 मी., 100 मी., 200 मी. धावणे, रिले रेस, गोळा फेक, लांब उडी, जलतरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीमती सावंत यांनी दिली.
येत्या शुक्रवारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
|