बातम्या

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनिल शुक्रे यांचा जिल्हा दौरा

District visit of State Backward Classes


By nisha patil - 8/16/2025 5:48:29 PM
Share This News:



राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनिल शुक्रे यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर, : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनिल शुक्रे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता कणेरी मठ, गोकुळ शिरगाव जि. कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम. 

रविवार, दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता कणेरी मठ येथून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जुने जिल्हा न्यायालय इमारत, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन व मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता कणेरी मठ, गोकुळ शिरगावकडे प्रयाण. सांयकाळी 6.45 वाजता कणेरी मठ येथे आगमन व दिनांक 24 ऑगस्ट 2025 पर्यंत मुक्काम. 

रविवार, दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता कणेरी मठ, गोकुळ शिरगाव येथून मुंबईकडे प्रयाण. 


राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनिल शुक्रे यांचा जिल्हा दौरा
Total Views: 87