बातम्या

एमपीएससी परीक्षेत जिल्ह्याचे यश — वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून तिघांची निवड

Districts success in MPSC exam


By nisha patil - 11/22/2025 3:26:34 PM
Share This News:



एमपीएससी परीक्षेत जिल्ह्याचे यश — वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून तिघांची निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील संतोष गोंधळी, राहुल खंदारे आणि शिवलिंग चव्हाण या तिघांची वरिष्ठ भूवैज्ञानिक (गट-अ) पदासाठी निवड झाली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर हा अंतिम निकाल जाहीर झाला.

संतोष गोंधळी — पन्हाळा तालुक्यातील रविवार पेठ येथे राहत असून, १९९६ साली धारवाड विद्यापीठातून भूशास्त्रात सुवर्णपदक मिळवले आहे.

राहुल खंदारे — कोल्हापूर शहरातील जवाहरनगर येथील रहिवासी. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातून पदवी व २०१२ साली पुणे विद्यापीठातून भूशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. सातारा, अहमदनगर व कोल्हापूरमध्ये भूवैज्ञानिक म्हणून कामाचा अनुभव.

शिवलिंग चव्हाण — कोल्हापूरातील आर. के. नगर येथील रहिवासी. राजाराम महाविद्यालयातून पदवी आणि २००८ साली पुणे विद्यापीठातून भूशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. जालना, पालघर, कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे सेवा.


एमपीएससी परीक्षेत जिल्ह्याचे यश — वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून तिघांची निवड
Total Views: 21