बातम्या
पत्नीचे नाव 'जाडी' सेव्ह केल्याने पतीला घटस्फोटाची नोटीस!
By nisha patil - 10/24/2025 3:00:30 PM
Share This News:
पत्नीचे नाव 'जाडी' सेव्ह केल्याने पतीला घटस्फोटाची नोटीस!
न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय — कॉन्टॅक्ट नावही ठरेल पुरावा!
तुर्कीत एका तरुणाने पत्नीचे नाव मोबाईलमध्ये ‘टॉम्बिक’ (अर्थ: जाडी) असे सेव्ह केल्याने पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस दिली. या प्रकरणात पतीने अपमानजनक संदेशही पाठवले होते, त्यामुळे न्यायालयाने हे भावनात्मक अत्याचार (इमोशनल अब्युज) मानले.
उशाक फॅमिली कोर्टातून सुरू झालेली ही लढाई तुर्कीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली, जिथे पत्नीच्या बाजूने निकाल देत पतीला आर्थिक व मानसिक नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. या निर्णयानंतर फोनमधील कॉन्टॅक्ट नाव देखील कायदेशीर पुरावा मानला जाणार आहे.
पत्नीचे नाव 'जाडी' सेव्ह केल्याने पतीला घटस्फोटाची नोटीस!
|