बातम्या
श्री. संत बाळूमामा दूध व्यावसायिक संस्थेकडून दूध उत्पादकांना दिवाळी बोनस, फराळ व ब्लँकेट वाटप
By nisha patil - 5/11/2026 2:37:03 PM
Share This News:
श्री. संत बाळूमामा दूध व्यावसायिक संस्थेकडून दूध उत्पादकांना दिवाळी बोनस, फराळ व ब्लँकेट वाटप
*आजरा(हसन तकीलदार) दिवाळी सणाचे औचित्य साधून श्री संत बाळूमामा दूध व्यावसायिक संस्था, मुमेवाडी ता.आजरा यांच्या वतीने संस्थेच्या सर्व सभासद दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनस, दिवाळी फराळ व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. वर्षभर संस्थेला सहकार्य करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या संस्थेमुळे परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबांना दुधातून आर्थिक स्थैर्य मिळाले असून, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात संस्था नेहमीच सोबत असते. दिवाळी बोनस व भेटवस्तू मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी व मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
श्री. संत बाळूमामा दूध व्यावसायिक संस्थेकडून दूध उत्पादकांना दिवाळी बोनस, फराळ व ब्लँकेट वाटप
|