बातम्या

शेतकऱ्यांच्या बांधावर अन् मेंढपाळांच्या तळावर दिवाळीचा फराळ! यशवंत ब्रिगेडचा उपक्रम

Diwali snacks delivered to farmers


By nisha patil - 12/11/2026 2:03:02 PM
Share This News:



शेतकऱ्यांच्या बांधावर अन् मेंढपाळांच्या तळावर दिवाळीचा फराळ! यशवंत ब्रिगेडचा उपक्रम

 

समाजातील गोरगरीब, कष्टकरी आणि गरजूंच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी यशवंत ब्रिगेड आणि कोळेकर परिवाराने सलग बाराव्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केवळ मदतवाटप न करता थेट गरजूंपर्यंत पोहोचण्याचा अनोखा उपक्रम यंदाही राबवण्यात आला. कुरुंदवाड, जयसिंगपूर, पट्टणकोडोली, पेठवडगाव, वारणानगर यांसह परिसरातील शेतांमध्ये जाऊन मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना, तसेच ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर, पदाधिकारी आणि सदस्यांनी थेट शेताच्या बांधावर आणि मेंढपाळांच्या तळावर जाऊन हा फराळ पोहोचवला. याशिवाय गेल्या बारा वर्षांपासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत, तसेच शेतकरी, मेंढपाळ आणि कष्टकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे कामही संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. प्रसिद्धीपेक्षा सेवेला प्राधान्य देत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणाऱ्या यशवंत ब्रिगेडचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप उजळवणारा ठरत आहे.


शेतकऱ्यांच्या बांधावर अन् मेंढपाळांच्या तळावर दिवाळीचा फराळ! यशवंत ब्रिगेडचा उपक्रम
Total Views: 9