विशेष बातम्या
अंबप ग्रामपंचायतीकडून निराधारांची दिवाळी गोड..
By nisha patil - 10/27/2025 2:43:12 PM
Share This News:
अंबप ग्रामपंचायतीकडून निराधारांची दिवाळी गोड..
‘सन्मानाने घास भरूया’ उपक्रमातून फराळ व साड्यांचे दान..
तारा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर जासूद हातकणंगले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अंबप ग्रामपंचायत आणि सरपंच दीप्ती माने यांच्या संकल्पनेतून ‘गरजूंच्या मुखी सन्मानाने घास भरूया’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने जमा झालेला दिवाळी फराळ आणि साड्यांचा संच शिरे येथील करूणालय बालगृह, कोल्हापूरातील निराधार महिला आश्रम एकटी संस्था आणि मातोश्री वृद्धाश्रम, मोरेवाडी येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी वाटप करण्यात आला.
या उपक्रमासाठी सरपंच दीप्ती माने, उपसरपंच अशीफ मुल्ला, सदस्या सरिता कांबळे, संगीता जाधव, ग्रामसेवक स्वप्निल कांबळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघमोडे, प्रमोद सूर्यवंशी, तुषार माने आणि राहुल जंगम यांचे विशेष सहकार्य लाभले.
अंबप ग्रामपंचायतीकडून निराधारांची दिवाळी गोड..
|