विशेष बातम्या
पाचर्डेतील विठ्ठल-रुक्मिणी दूध संस्थेचा दीपावलीत गोडवा..
By nisha patil - 10/17/2025 3:40:56 PM
Share This News:
पाचर्डेतील विठ्ठल-रुक्मिणी दूध संस्थेचा दीपावलीत गोडवा..
म्हैस दुधास १२% तर गाय दुधास १६% उच्चांकी दर फरक वाटप
भुदरगड तालुक्यातील पाचर्डे येथील विठ्ठल-रुक्मिणी दूध संस्थेने या वर्षीच्या दीपावलीनिमित्त सभासदांना उच्चांकी दूध दर फरक वाटप करून दिलासा दिला आहे. म्हैस दुधास १२ टक्के, तर गाय दुधास १६ टक्के दर फरक देण्यात आला असून, यामुळे शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील म्हणाले की, “गेल्या तीन-चार वर्षांत संस्थेने सातत्याने प्रगती केली आह
गोकुळ दूध संघाकडून मिळालेल्या फरकासोबतच संस्थेने नफ्यातून दिलेला दर फरक हा सभासदांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कष्ट आणि विश्वास हेच आमचे बळ आहे.”सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,“सभासदांनी चांगल्या प्रतीचे दूध संस्थेकडे घातल्यास सभासदांचा व दूध संस्थेचा देखील फायदा होईल. पुढील काळात म्हैस दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.”या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन बळीराम पाटील, ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी सरनोबत यांच्या उपस्थितीत सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला यशवंत पाटील, महादेव पाटील, गणपती पाटील, सुधीर पाटील, उत्तम पाटील, नामदेव पाटील, पांडुरंग भाददिगरे, बबन लाड, रंगराव पाटील, बाळू सुतार, धोंडीराम लाड, के. बी. पाटील आदी सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सचिव दत्तात्रय कांबळे यांनी मानले.
पाचर्डेतील विठ्ठल-रुक्मिणी दूध संस्थेचा दीपावलीत गोडवा..
|