बातम्या
उत्कृष्ट दर्जाचे काम करा अन्यथा.. रवी किरण इंगवलेंचा इशारा
By nisha patil - 9/23/2025 4:28:38 PM
Share This News:
उत्कृष्ट दर्जाचे काम करा अन्यथा.. रवी किरण इंगवलेंचा इशारा
दर्जेदार रस्ता न झाल्यास आंदोलनाची तयारी”
देवकर पाणंद चौक ते यशवंत लॉन ते ज्योर्तिलिंग सिरॅमिक या रस्त्याचे काम त्वरीत सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण विष्णुपंत इंगवले यांनी केली आहे.
या रस्त्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असूनही काम सुरु करण्यात विलंब होत आहे. शिवाय, संबंधित रस्त्यासाठी काँक्रीट रस्त्याची मान्यता नसताना कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे, असा आरोप इंगवले यांनी केला. महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमतामुळे नागरिकांची दिशाभूल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“निधी मंजूर असूनही दर्जेदार काम होत नाही, हा प्रकार नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित आणि उत्कृष्ट दर्जाचे काम सुरु करावे, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल,” असा इशारा इंगवले यांनी दिला आहे.
उत्कृष्ट दर्जाचे काम करा अन्यथा.. रवी किरण इंगवलेंचा इशाराउत्कृष्ट दर्जाचे काम करा अन्यथा.. रवी किरण इंगवलेंचा इशारा
|