बातम्या

उतारवयात आई-वडिलांची हेळसांड नको! ज्येष्ठ पत्रकार एन. एस. पाटील यांचे कुटुंबीयांना आवाहन!

Do not neglect parents in their old age


By nisha patil - 9/10/2026 7:34:02 PM
Share This News:



उतारवयात आई-वडिलांची हेळसांड नको! ज्येष्ठ पत्रकार एन. एस. पाटील यांचे कुटुंबीयांना आवाहन!

 

तारा न्यूजसाठी प्रतिनिधी अजित बोडके कागल तालुक्यातील शेंडूर येथे श्री गणेश ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे सदस्य एन. एस. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांची उतारवयात हेळसांड होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांनी तरुणपणी कुटुंब आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे उतारवयात त्यांच्या आहार, आरोग्य आणि औषधोपचारांची काळजी घेणे ही कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. के. कुंभार यांनी घर, शेती आणि स्थावर मालमत्ता मुलांच्या नावावर करताना योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग रामचंद्र कवडे होते. यावेळी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच सभासदांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

 


उतारवयात आई-वडिलांची हेळसांड नको! ज्येष्ठ पत्रकार एन. एस. पाटील यांचे कुटुंबीयांना आवाहन!
Total Views: 10