बातम्या
*शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालू वर्षाचे व्याजही माफ करा
By Administrator - 5/11/2026 10:30:10 PM
Share This News:
*शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालू वर्षाचे व्याजही माफ करा
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
*आजरा(हसन तकीलदार):- यावर्षी आजरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने घोषित केले असलेने बँका,पतसंस्था किंवा फायनान्स कंपन्या शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती अथवा तगादा लावू नये असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना आजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेमार्फत निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,चालू वर्षी तालुक्यामध्ये अलनीनोमुळे पाऊस कमी प्रमाणात पडला यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी अलेली पिके करपुन वाळून गेली यामुळे या वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे मोठे आर्थिक संकट त्यांच्यावर आलेले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झालेले आहे. यातच तालुक्यातील बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्था या कर्जफेडण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. या यादीमध्ये आजरा तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकानी, पतसंस्था व फायनान्स कंपन्यानी जबरदस्ती करु नये अथवा तगादा लावू नये व चालु आर्थिक वर्षाचे व्याजही माफ करावे. अशा सुचना आपल्याकडुन संबंधिताना करण्यात याव्या.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार(तालुका अध्यक्ष), दिनेश कांबळे(शेतकरी सेना तालुका अध्यक्ष), शिवाजी आडाव,संजय सावंत(देऊळवाडी), सुयश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
*शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालू वर्षाचे व्याजही माफ करा
|