बातम्या
“राजकारण करा, पण ते समाजहिताचं असावं” – सतिश माळगे यांचा सल्ला
By nisha patil - 4/16/2025 6:14:25 AM
Share This News:
“राजकारण करा, पण ते समाजहिताचं असावं” – सतिश माळगे यांचा सल्ला
उचगाव, कोल्हापूर –छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज नगर, मनेरमाळ, उचगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे यांच्या “सलाम संविधान” या प्रबोधनात्मक, उर्जादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ट्रस्टचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मा. सतिश माळगे (दादा) व सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चना माळगे होते.
यावेळी सतिश माळगे म्हणाले,
“राजकारण जरूर करा, पण ते समाजाच्या हितासाठी असावं. अन्यथा अंतर्गत दुहीमुळे चळवळ संपण्याची शक्यता असते. बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असेल, तर प्रेम, आपुलकी आणि आदर आवश्यक आहे.”
कार्यक्रमात गायक कबीर नाईकनवरे यांना दुबईत मिळालेल्या “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड – लंडन” पुरस्काराबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय, परिसरातील पत्रकार बांधवांचा ट्रस्टच्या वतीने शाल, ट्रॉफी आणि वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती होती, व भीम अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चना माळगे यांनी केलं.
“राजकारण करा, पण ते समाजहिताचं असावं” – सतिश माळगे यांचा सल्ला
|