बातम्या
Doctors’ Day निमित्त दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स व स्टाफचा सन्मान..
By nisha patil - 1/7/2025 4:55:07 PM
Share This News:
Doctors’ Day निमित्त दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स व स्टाफचा सन्मान..
डॉ. जाधव यांचा स्तुत्य उपक्रम – दोन टीबी रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार वाटप
Doctors' Day च्या निमित्ताने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात एक भावनिक व सन्मानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ. जाधव मॅडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत दोन टीबी रुग्णांना दत्तक घेतले आणि त्यांच्यासाठी पोषण आहाराच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. ही कृती उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.
यड्रावकर ग्रुपच्या वतीने रुग्णालयातील सर्व स्टाफला भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे ज्येष्ठ नेते मा. D. N. सिदनाळे, भाजपा किसान मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पवार, शिवसेना नेते बाळासो कोकणे, अशोक पाटील, अण्णासो सिदनाळे, महावीर पाटील, पत्रकार मुन्नाभाई नदाफ, संजय सुतार, दीपक हेमगिरे, नूरमोहम्मद नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून डॉक्टर्स आणि आरोग्यसेवकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
Doctors’ Day निमित्त दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स व स्टाफचा सन्मान..
|