ताज्या बातम्या
मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; अकरा नागरिक जखमी
By nisha patil - 3/12/2025 11:47:37 AM
Share This News:
कोल्हापूर : मुरगूड बाजारपेठेत सोमवारी दुपारी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत.
जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. काहींच्या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा वाढता विळखा आणि लसींच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद असून, रेबिज लसींच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना, भटक्या प्राण्यांचे निर्बीजिकरण आणि लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करणे — ही तातडीची गरज असून नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत ठोस कारवाईची मागणी केली आहे.
मुरगूडच्या या घटनेने पुन्हा एकदा नागरी सुरक्षेच्या दुर्लक्षाचा सवाल ऐरणीवर आणला असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आल्याचे जाणकारांचे मत आहे.
मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; अकरा नागरिक जखमी
|