बातम्या
१,५५,४५४/ रुपये किंमतीचा देशी-विदेशी दारू पन्हाळा पोलिसांकडून जप्त
By nisha patil - 3/10/2025 1:21:39 PM
Share This News:
पन्हाळा:- (शहाबाज मुजावर) दिनांक ०१/१०/२०२५ रोजी संध्याकाळी कोतोली ता. पन्हाळा येथे अमित बिअर शॉपी जवळ,एन मार्ट चे समोर दुर्वा हॉटेल बाजूस अभिजीत श्रीपती चौगुले रा. कोतोली, यांचे घरामागे खोलीत,१,५५,४५४/ रुपये किंमतीचा वेगवेळ्या देशी-विदेशी दारू विकण्याच्या उद्दिष्टाने आढळून आली.
आरोपी तानाजी आकाराम पाटील रा. कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर याने बेकायदा, बिगर परवाना देशी-विदेशी दारुचा मालाचा बेकायदेशीर साठ करुन आपले स्वतःचे फायद्याकरीता आरोपी यांने गावात विक्री करण्याचे उद्देशाने आढळल्या आहेत. १७४/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल.
मा.अपर पोलीस अधिक्षक धिरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनरीक्षक, इम्रान मुल्ला सहा. फौजदार दिनकर शेळके, सहा. फौजदार समीर मुल्ला, दिगंबर रसाळ, प्रतिक शिंदे, पन्हाळा पोलीस च्या वतीने सलीम सनदी,सागर माने, निलेश पडवळ , अमर चव्हाण. यांनी ही कारवाई केली.
१,५५,४५४/ रुपये किंमतीचा देशी-विदेशी दारू पन्हाळा पोलिसांकडून जप्त
|