बातम्या
घरगुती गॅस वितरण नियोजनबद्ध सुरु आहे, अफवाना बळी पडू नका-धनश्री देसाई
By Administrator - 3/26/2026 1:28:02 PM
Share This News:
घरगुती गॅस वितरण नियोजनबद्ध सुरु आहे, अफवाना बळी पडू नका-धनश्री देसाई
आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यामध्ये रवळनाथ इंडेन गॅस एजन्सी तर्फे जवळ जवळ 25 हजार ग्राहकांना अगदी व्यावस्थितपणे गॅस वितरण सेवा सुरु आहे. अफवाना बळी पडू नका. नोंदणी केल्यानंतर डी. ए. सी. नंबर आलेनंतर घरपोच सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑफिससमोर गर्दी करून अडचणी निर्माण करू नका असे आवाहन रवळनाथ इंडेन गॅस एजन्सीच्या वितरक सौ. धनश्री मानसिंग देसाई यांनी केले आहे.
सद्या गॅसचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सद्या गॅसच्या गाड्या कंपनीकडून व्यवस्थितपणे येत आहेत. मागणीप्रमाणे कंपनीकडून गाड्या भरून येत आहेत. अफवावर विश्वास न ठेवता सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे. डी. ए. सी. नंबर आलेनंतर पूर्वीप्रमाणे वेळेत सिलेंडरची घरपोच सेवा देण्यात येईल त्यामुळे ऑफिससमोर रांगा लावून गॅस घेण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे लोकांच्यामध्ये गैरससमज पसरू शकतो असे आवाहन रवळनाथ गॅस एजन्सीचे संचालक धनश्री देसाई व मानसिंग देसाई यांनी केले आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक सिलेंडरचे वितरणही तहसील पुरवठा विभागाच्या परवानगीनुसार व त्यांचे नियोजनानुसार केले जाणार आहे असे सांगण्यात आले.
घरगुती गॅस वितरण नियोजनबद्ध सुरु आहे, अफवाना बळी पडू नका-धनश्री देसाई
|