बातम्या

दान केलेल्या गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांकडून परत विसर्जित

Donated Ganesh idols re immersed by Hindu devotees


By nisha patil - 9/17/2025 5:40:16 PM
Share This News:



दान केलेल्या गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांकडून परत विसर्जित

मूर्तीदान परंपरेविरोधी, प्रशासनाने धडा घ्यावा : संभाजीराव भोकरे

कळंबा तलावात दान म्हणून घेतलेल्या आणि विसर्जित न केलेल्या श्री गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांकडून परत विसर्जित करण्यात आल्या. या उपक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे आणि यादव महाराज सहभागी झाले.

संभाजीराव भोकरे म्हणाले की, ‘‘दान म्हणून घेतलेल्या मूर्ती उघड्यावर ठेवणे हा भाविकांचा अपमान आहे. प्रशासनाने मूर्तीदानासारखी कृती थांबवावी.’’


दान केलेल्या गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांकडून परत विसर्जित
Total Views: 110