विशेष बातम्या
अलमट्टीची उंची वाढवू नका..
By nisha patil - 3/6/2025 6:25:25 PM
Share This News:
अलमट्टीची उंची वाढवू नका..
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन.
उंची वाढविणारच..कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा इशारा
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये आता नवीन वाद निर्माण झालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती केली आहे. मात्र कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी धरणाची उंची वाढविणारच असा पवित्रा घेतलाय. बंगरूळ मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत "महाराष्ट्र सरकार विनाकारण वाद निर्माण करत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविणारच असा पवित्रा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी घेतलाय.त्यामुळे आता अलमट्टीच्या प्रश्नामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अलमट्टीची उंची वाढवू नका..
|