विशेष बातम्या
नुसता आनंद साजरा न करता किल्ल्यांचे जतन करा - राज ठाकरे
By nisha patil - 12/7/2025 3:23:11 PM
Share This News:
नुसता आनंद साजरा न करता किल्ल्यांचे जतन करा - राज ठाकरे
जात धर्म न पाहता अतिक्रमणे हटवा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून जनतेचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर त्यांनी एक्स पोस्टद्वारे सरकारला चिमटा देखील काढलाय.
या निर्णयामुळे महाराजांच्या स्वराज्याच्या विचाराचा आणि महाराष्ट्राच्या वैभवाचा जगभर प्रचार होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, केवळ जागतिक दर्जा मिळाल्याचा आनंद न मानता सरकारने किल्ल्यांचे नीट संवर्धन करावे आणि अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवावी, यामध्ये जात धर्म पाहू नये अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
नुसता आनंद साजरा न करता किल्ल्यांचे जतन करा - राज ठाकरे
|