बातम्या
गांधीनगर बाजारपेठेत बॅरिकेट लावून वाहनांची आडवणूक नको – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
By nisha patil - 11/10/2025 4:21:05 PM
Share This News:
गांधीनगर बाजारपेठेत बॅरिकेट लावून वाहनांची आडवणूक नको – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलिसांनी केलेले बदल हे मूळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने करण्यात आला. पार्किंगची व्यवस्था बाजारपेठेच्या एका बाजूस केल्याने ग्राहकांना मुख्य बाजारपेठेत प्रवेश मिळत नाही, असा व्यापाऱ्यांचा सूर आहे.
या संदर्भात तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी करवीर यांच्या नावे निवेदन पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना दिले. या वेळी अधिकाऱ्यांनी “कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही,” असे आश्वासन दिले.
राजू यादव म्हणाले, “वाहतुकीची कोंडी टाळण्याचा उद्देश चांगला असला तरी पार्किंग व्यवस्था बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना असावी. सध्या एका बाजूसच पार्किंग केल्याने सिंधू मार्केट, गुरुनानक, स्वस्तिक, झुलेलाल, गजानन, छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील शेकडो व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “वीटभट्टीजवळील काही मोठ्या दुकानांनाच याचा फायदा होत आहे, तर मुख्य बाजारपेठेतील सुमारे ५०० दुकानदारांचा व्यवसाय घटला आहे.”
शिवसेनेच्या मागणीनुसार, तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत ग्राहकांना प्रवेश द्यावा, तसेच दोन्ही टोकांना पार्किंगची व्यवस्था करावी.
या वेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, सुनील चौगुले, जितेंद्र कुबडे, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, दिलीप सावंत, दीपक फ्रेमवाला, विनोद रोहिडा, दीपक अंकल, सतीश कारडा, संजय काळुगडे, अजित पाटील, विशाल चंदवानी आदी शिवसैनिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधीनगर बाजारपेठेत बॅरिकेट लावून वाहनांची आडवणूक नको – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
|