बातम्या

वालावलकर हायस्कूलला जलतरण मध्ये दुहेरी सुवर्ण मुकूट ; बेलवलकर बंधुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Double gold triumph for Valavalkar High School in swimming


By nisha patil - 10/29/2026 2:11:34 PM
Share This News:



वालावलकर हायस्कूलला जलतरण मध्ये दुहेरी सुवर्ण मुकूट ; बेलवलकर बंधुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
 

कोल्हापूर  :  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूलने मनपा शालेय जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये  जलतरण या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करून दुहेरी सुवर्ण मुकूट पटकावला .  जलतरण स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात  प्रसन्न  प्रविण बेलवलकर याने ५० आणि १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात विजेतेपद संपादन करून सुवर्णपदक पटकावले. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली . तर १७  वर्ष वयोगटामध्ये  चैतन्य प्रविण बेलवलकर याने १०० मीटर आणि २०० मीटर बॅक स्ट्रोक या क्रीडा प्रकारात धवल कामगिरी करून सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावले. त्याचीही सातारा येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
 

 या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक  राजेंद्र बनसोडे, क्रीडा प्रमुख  समीर जमादार,  सागर वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले आणि वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक  संजय सौंदलगे,  पर्यवेक्षिका सरिता शिंदे, शालेय समिती चेअरमन संजीवभाई परीख ज्येष्ठ संचालक आणि संस्थेचे माजी सचिव एम . एस. पाटोळे कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.


वालावलकर हायस्कूलला जलतरण मध्ये दुहेरी सुवर्ण मुकूट ; बेलवलकर बंधुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Total Views: 8