बातम्या

*डॉ. अनंत कुर्‍हाडे यांची सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत निवड

Dr Anant Kurhade selected for the list of the world


By nisha patil - 11/10/2026 7:22:19 PM
Share This News:



*डॉ. अनंत कुर्‍हाडे यांची सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत निवड
 

*आजरा(हसन तकीलदार):- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे कार्यरत असलेले डॉ. अनंत सिद्धाप्पा कुर्‍हाडे भडगाव ता. गडहिंग्लज यांची २०२५ आणि २०२६ या सलग दोन वर्षांसाठी जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भडगावसह शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या सहकार्याने प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीनुसार, डॉ. कुर्‍हाडे यांचे मुख्य संशोधन क्षेत्र अभियांत्रिकी (Engineering) असून, उपसंशोधन क्षेत्र खाणकाम व धातुविज्ञान (Mining & Metallurgy) आहे. उपलब्ध क्रमवारीच्या प्रमाणपत्रानुसार, या उपक्षेत्रात त्यांचा जागतिक क्रमांक १,७८४ असून, त्यांचा एच-इंडेक्स २१ आणि एचएम-इंडेक्स ७ आहे.

डॉ. कुर्‍हाडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अभियांत्रिकी पदवी (B.E.), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (M.E.) आणि के. एल. विद्यापीठ, विजयवाडा येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधन प्रवासात पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. गोविंदराजन मुरली यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधन कार्याला दिशा मिळण्यास मदत झाली.

डॉ. कुर्‍हाडे यांनी अभियांत्रिकी संशोधन, वैज्ञानिक लेखन आणि तांत्रिक अभ्यासाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. सलग दोन वर्षे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे ही त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासातील महत्त्वाची उपलब्धी आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सहकारी, मित्रपरिवार आणि भडगावमधील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील संशोधन कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


*डॉ. अनंत कुर्‍हाडे यांची सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत निवड
Total Views: 260