बातम्या
डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड
By nisha patil - 12/19/2025 5:14:47 PM
Share This News:
डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड
कोल्हापूर दि.19 : सांगरूळ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील मेनलँड फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड झाली आहे. हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, समाजातील अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरलेला अभिमानाचा क्षण आहे. शैक्षणिक वारसा नसलेल्या सामान्य कुटूंबातून येऊन व ग्रामीण भागात राहून जिद्दीने शिक्षण पूर्ण करुन तिने हे यश मिळविले आहे. डॉ.अनिताचे वडील श्री. कुंडलिक तावडे हे विवेकानंद कॉलेजचे कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलगीने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे.
डॉ. अनिता तावडे यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे ही नामांकित आंतरराष्ट्रीय संधी मिळवली आहे. चीनच्या प्रतिष्ठित विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल फेलोशिप मिळणे ही कोल्हापूर जिल्ह्यातील संशोधकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे स्थानिक स्तरावर शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नव्या प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. तावडे यांच्या या यशाबद्दल सांगरूळ आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक नाही, तर ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण आणि संशोधनाकडे वळण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण सांगरुळ हायस्कूल येथे झाले असून ज्युनिअर सायन्सचे चे शिक्षण डी.सी.नरके महाविद्यालय येथे झाले आहे. बी.एस्सी. व एम.एस्सी. पीएच.डी (नॅनो टेक्नॉलॉजी) चे शिक्षण शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे झाले आहे.तिलाशिवाजी विद्यापीठातील डॉ. तायडे व डॉ.शर्मा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
तिची या संशोधनासाठी निवड झालेबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड
|