बातम्या

क्रांतीसुर्य युथ आयडॉल पुरस्कारासाठी डॉ. अनुप्रिया गावडे यांची निवड!

Dr Anupriya Gawade selected for Krantisurya Youth Idol Award


By Administrator - 7/28/2025 12:51:26 PM
Share This News:



क्रांतीसुर्य युथ आयडॉल पुरस्कारासाठी डॉ. अनुप्रिया गावडे यांची निवड!

 पाच विश्वविक्रमांची मानकरी, संविधान जागृतीसाठी कार्यरत बाल अँबेसिडर!

 शांतिनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या आणि पाच विश्वविक्रमांच्या मानकरी असलेल्या भारत विभूषण प्रा. डॉ. अनुप्रिया गावडे यांची यंदाच्या क्रांतीसुर्य युथ आयडॉल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार ४ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे दिला जाणार आहे. राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेतील यश, संविधान आणि बालहक्क कायद्यावरील जागृती कार्य, तसेच ८,००० हून अधिक लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे कार्य यामुळे ती विविध मंचावर देश-विदेशात गौरवली गेली आहे. तिने आजवर ९० पेक्षा अधिक सुवर्णपदक आणि ६० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. तिचे यश तिच्या पालक अमित व डॉ. अक्षता गावडे, शाळेच्या संचालिका सौ. काकडे मॅडम आणि शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाने घडले आहे.


क्रांतीसुर्य युथ आयडॉल पुरस्कारासाठी डॉ. अनुप्रिया गावडे यांची निवड!
Total Views: 68