शैक्षणिक
विद्यामंदिर सडोली दुमाला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
By nisha patil - 4/15/2025 4:04:43 PM
Share This News:
विद्यामंदिर सडोली दुमाला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
सडोली दुमाला येथील विद्यामंदिरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत महापुरुषांप्रती आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिका भोसले, उपाध्यक्ष अशोक कांबळे, ग्रामपंचायत सरपंच अभिजीत पाटील, प्रा. शहाजी सुतार, विक्रम पाटील, भीमराव केसरकर, संग्राम पाटील, दादू कांबळे, भाऊसाहेब भोसले, सारिका देसाई व रेश्मा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणं सादर केली. काही विद्यार्थिनींनी भीमगीते व पोवाड्याद्वारे बाबासाहेबांना मानवंदना दिली. यासोबतच चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
संघर्ष असंघटित कामगार संघटनेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अशोक कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. श्रीमती विठाबाई कांबळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केले.
भाऊसाहेब भोसले यांनी, “मतदानाचा पवित्र हक्क बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला,” असे सांगून विद्यार्थ्यांना जागृतीचा संदेश दिला. प्रा. शहाजी सुतार यांनी बाबासाहेबांचे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ कुंभार, अध्यापक चंद्रकांत थोरवत, भीमराव पाटील, अश्विनी पोवार, योगिता निकम यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधराध्यापक महादेव खोंद्रे यांनी केले. स्वागतप्रपंच मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी केला तर आभार प्रदर्शन अध्यापिका सुरेखा नलवडे यांनी मानले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नवचैतन्याची प्रेरणा देणारा ठरला.
विद्यामंदिर सडोली दुमाला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
|