बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Dr Babasaheb Ambedkar Jayanti celebrated at Vivekananda College


By nisha patil - 4/14/2025 4:34:01 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 कोल्हापूर दि. 14 : येथील  विवेकानंद महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्‍न्‍ा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान दिले. त्यांनी मानवतेचा विचार मांडला.  ते मानव्याचे दीपस्तंभ होते. सर्वधर्मसमभाव हा भारतीय समाजाचा मुलाधार आहे.  तो आपण जतन केला पाहिजे. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधूता या  मूलभूत तत्वांचा विचार मांडला.  आज देशाला दलित्तेतर डॉ.बाबासाहेब समजून घेण्याची गरज आहे.   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणसंस्था स्थापन केली त्यामुळे बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय झाली. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. दत्ता जाधव  यांनी केले तर आभार डॉ.संतोष कोळी यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र व समाजशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे गणितविभागप्रमुख प्रा. एस. पी. थोरात,  रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग , एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन्‍ सुनिता भोसले, लेप्टनंट प्रा.जे आर भरमगोंडा, ज्युनि.सायन्स विभागप्रमुख प्रा.एम.आर.नवले, ज्युनि.आर्टस कॉमर्स स्टाफ सेक्रेटरी प्रा.व्ही.एन.कुलकर्णी, ज्युनिअर, सिनिअर कॉलेज मधील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी  एन.सी.सी. एन.एस.एस. विद्यार्थी  उपस्थित होते.


विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Total Views: 200