शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day celebrate


By nisha patil - 6/12/2025 12:56:08 PM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार) येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य  एम.एम.नागुर्डेकर  पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
    एस. वाय. भोये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यामध्ये त्यांचे बालपणीच्या शिक्षणापासून ते त्यांनी मिळवलेल्या जगातल्या मोठ्यात मोठ्या विद्यापीठातल्या वेगवेगळ्या पदव्यांचा उल्लेख केला. एवढ्या पदव्या जगातल्या निश्चितच फार कमी लोकांनी मिळविले असतील आणि या ज्ञानाचा वापर करून त्यांनी भारतीय संविधान लिहिले. नोकरवर्गांसाठी आणि महिलांसाठी त्यांनी विविध कायदे,आरक्षण करून त्यांना सोयीसुविधा पुरवत न्याय मिळवून दिला हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
       एम. एम. नागुर्डेकर यांनी देखील आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब यांना वाचनाची खूप आवड होती ग्रंथालयामध्ये ते अठरा तास अभ्यास करत असत.. परिस्थिती हालाखीची असल्याने यादरम्यान वाचन करत असताना भूक लागू नये म्हणून ते  निव्वळ पाव खाऊन त्यावर तांब्याभर पाणी पीत असत.. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी देशात तसेच परदेशात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले.
    वरील कार्यक्रमाचे आयोजन सौ.ए.एस. गुरव व इयत्ता आठवी ड या वर्गाने केले होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


व्यंकटराव शिक्षण संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.
Total Views: 65