बातम्या

डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळमध्ये मान्यवरांची उपस्थिती

Dr Dignitaries attend Shirol on the occasion of Ashokrao Manes birthday


By nisha patil - 5/31/2025 3:31:22 PM
Share This News:



डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळमध्ये मान्यवरांची उपस्थिती

शिरोळ भूषण पुरस्काराने शिक्षण क्षेत्रातील महिलांचा गौरव

 शिरोळ (ता. हातकणंगले) येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर व आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून डॉ. माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात दलितमित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शिरोळ भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व शिरोळ जनता हायस्कूलच्या प्राचार्य श्रीमती पुष्पा दत्त कळेकर आणि शिरोळ गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास दादा पाटील, रावसाहेब देसाई, माजी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, गटशिक्षणाधिकारी संगीता नरंदे, तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.


डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळमध्ये मान्यवरांची उपस्थिती
Total Views: 135