शैक्षणिक
डॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कार
By nisha patil - 5/12/2025 1:12:27 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. ५ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील डॉ. हर्षवर्धन चंद्रकांत पंडित यांना बौद्धिक संपदा हक्क प्रशिक्षण आणि परिसंस्था सक्षमीकरण या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथे ‘आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स अॅवॉर्ड-२०२५’ प्रदान करण्यात आला.
आंत्रप्रेन्योरशिप स्टार्टअप अँड इनोव्हेशन फोरम, पुणे (ईएनएसआयएन) आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (व्हीआयटी) यांच्यातर्फे आयोजित संयुक्त कार्यक्रमात पंडित यांना ३ डिसेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला. विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पुष्कराज समूहाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र गोस्वामी आणि फोरमचे चेअरमन डॉ. कल्लूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्ही. आय. टी.चे संचालक डॉ. राजेश जालनेकर, शिरीष कुलकर्णी, संतोष रंजन, संजय जगताप, डॉ. माने आदी उपस्थित होते.
डॉ. हर्षवर्धन पंडित बौद्धिक संपदा (IP) जनजागृती, पेटंट प्रक्रिया प्रशिक्षण, प्रायर-आर्ट सर्च, TRL उन्नयन आणि स्टार्टअप इकोसिस्टम विकास या क्षेत्रांत काम करीत आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांना पेटंट, डिझाइन, आणि IP फाइलिंग प्रक्रिया समजून देण्यात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत डॉ. पंडित यांनी मदत केली आहे.
डॉ. पंडित यांना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग समन्वयक डॉ. प्रवीण प्रभू यांचे प्रोत्साहन लाभले.
डॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कार
|