शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात डॉ. इस्माईल पठाण यांचे व्याख्यान
By nisha patil - 9/13/2025 1:04:31 PM
Share This News:
कोल्हापूर (प्रतिनिधी):
शिवाजी विद्यापीठ आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांचे “महाराष्ट्राचे समाजजीवन व परिवर्तन” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शहाजी महाविद्यालयातील विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात आयोजित केला आहे.
कार्यक्रमाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हाईस चीफ पेट्रन तथा चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे, सौ. सुचेता कोरगांवकर आणि सौ. पल्लवी कोरगांवकर प्रमुख उपस्थित राहणार असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी राहतील.
महाविद्यालयाच्या वतीने सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहाजी महाविद्यालयात डॉ. इस्माईल पठाण यांचे व्याख्यान
|