शैक्षणिक

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

Dr JJ Magdoom selects eight engineering students for jobs


By nisha patil - 5/17/2025 3:11:19 PM
Share This News:



डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

 जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॉम्प्युटर,आय.टी.व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन  विभागामधील आठ विद्यार्थ्यांची प्रोमॅक्सिस सॉफ्टवेअर सोल्युशन  व विप्रो पारी  प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली .
     

निवड झालेल्यां विद्यार्थ्यांच्यामध्ये  कॉम्प्युटर विभागाच्या शर्वरी कुलकर्णी, ताहुरा शेख, आय.टी. विभागाच्या  श्रेयश देशमाने, अभिषेक मगदूम, श्रेया  माने, इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या राधेय पेंडूरकर, श्वेता जाधव, व दक्षा निकम आहेत.
               

ए.आय, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स  व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळे  हे शक्य होते असे मत  प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केले.
     

ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे, विभाग प्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
Total Views: 69