शैक्षणिक
डॉ. जयवंत गुंजकर यांची 'इंडियन केमिकल सोसायटी'च्या लाइफ फेलो म्हणून निवड
By nisha patil - 10/6/2025 9:40:15 PM
Share This News:
डॉ. जयवंत गुंजकर यांची 'इंडियन केमिकल सोसायटी'च्या लाइफ फेलो म्हणून निवड
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची इंडियन केमिकल सोसायटीने 'लाइफ फेलो' म्हणून निवड केली आहे. पदार्थ विज्ञान आणि संकरित पदार्थ क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची दखल घेत ही गौरवमूल्य निवड करण्यात आली.
त्यांनी ८५ शोधनिबंध, ७ पेटंट प्रसिद्ध केले असून सहा पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.
डॉ. जयवंत गुंजकर यांची 'इंडियन केमिकल सोसायटी'च्या लाइफ फेलो म्हणून निवड
|