बातम्या
आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके यांची बिनविरोध निवड
By nisha patil - 9/18/2026 6:29:52 PM
Share This News:
आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके यांची बिनविरोध निवड
कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी (नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मेंबर) दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.डॉ.नरके यांच्या या निवडीमुळे डी. वाय. पाटील ग्रुपला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील , कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले.या निवडीसाठी आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
देशभरातील नामवंत संस्थांमधील संस्थाचालक,कुलगुरू, रजिस्ट्रार,प्राचार्य,अनुभवी प्राध्यापक हे आयएसटीईचे कौन्सिल मेंबर म्हणून निवडले जातात.
आयएसटीईमध्ये देशभरातील साडे पाच हजार शैक्षणिक संस्था सभासद असून दीड लाखाहून अधिक तंत्रशिक्षण शिक्षक लाइफ मेंबर तर दोन लाखाहून अधिक विद्यार्थी हे सदस्य आहेत.
शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यासाठी कार्यशाळा तसेच प्रशिक्षणाचे आयोजन, विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यक्रम, तांत्रिक शिक्षणाचा दर्जा आणि अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी उपक्रम तसेच संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शिक्षण संस्थाचे उद्योगांसोबत सहकार्य वाढवणे, राष्ट्रीय स्तरावर सेमिनार, कॉन्फरन्स, कार्यशाळा आयोजित करणे, शिक्षक आणि विद्यार्थी यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे, असे विविध उपक्रम आयएसटीईच्या वतीने राबविले जातात.
डॉ. नरके यांना आजवर रोटरी क्लब, किर्लोस्कर ग्रुप, आयएसटीई तसेच लोकमत मीडिया ,डिजिटल मिडिया संघटना ,समाजक्रांती संघटना अशा अनेक नामांकित संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या संधीच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी काम करून आयएसटीई आणखी नावारूपाला आणू असा विश्वास डॉ.नरके यांनी व्यक्त केला.
आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके यांची बिनविरोध निवड
|