विशेष बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर : विचारांचा खून होत नसतो…

Dr Narendra Dabholkar


By nisha patil - 8/20/2025 2:43:47 PM
Share This News:



 डॉ. नरेंद्र दाभोलकर : विचारांचा खून होत नसतो…

आज २० ऑगस्ट हा समाजप्रबोधनाचे प्रखर पुरस्कर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रवर्तक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन. २०१३ मध्ये झालेल्या त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला, मात्र त्यांच्या विचारांची मशाल आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे.

डॉ. दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. “विचारांचा खून होत नसतो…” या वाक्याची प्रचिती आज त्यांच्या कार्यातून दिसते. लोकमानसात विज्ञाननिष्ठा, विवेकवाद आणि तर्कशुद्ध विचार रुजवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं.

त्यांनीच म्हटलं होतं :
“Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a freeman.”

आज त्यांच्या जाण्यानं जरी मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी समाजात निर्माण झालेली विज्ञाननिष्ठ विचारसरणी हीच त्यांची खरी संपत्ती आणि प्रेरणा आहे.


डॉ. नरेंद्र दाभोलकर : विचारांचा खून होत नसतो…
Total Views: 52