शैक्षणिक
डॉ. नूतन राऊत यांच्या अल्पबचत गटाच्या मार्केटिंग पद्धती या पुस्तकाचे शहाजी महाविद्यालयात प्रकाशन
By nisha patil - 2/24/2026 5:47:11 PM
Share This News:
डॉ. नूतन राऊत यांच्या अल्पबचत गटाच्या मार्केटिंग पद्धती या पुस्तकाचे शहाजी महाविद्यालयात प्रकाशन
शहाजीयन विद्यार्थी मंडळाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर: प्रा. डॉ. नूतन दत्तात्रय राऊत यांनी लिहिलेल्या अल्प बचत गटाच्या मार्केटिंग पद्धती ( मार्केटिंग प्रॅक्टिसेस इन सेल्फ हेल्प ग्रुप) या पुस्तकाचे प्रकाशन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज संपन्न झाले. शहाजी महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थी आहेत. यावेळी शहाजीयन विद्यार्थी मंडळाचा माजी विद्यार्थी मेळावाही संपन्न झाला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. सुधाकर मानकर प्रा. डी. डी. कदम, अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. एस. टी. मुळे, प्रा. एन.व्ही.हारुगडे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रारंभि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.
अजित दादा यांच्या कार्यास प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी उजाळा दिला.
डॉ. नूतन राऊत म्हणाल्या, या महाविद्यालयात मी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1992 साली नेट परीक्षाही पास झाले. या महाविद्यालयात आणि आजरा व विटा येथील महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. प्रचंड संघर्ष करत आई वडील, गुरुजन आणि पती व कुटुंबीयांच्या मदतीतून शिक्षण क्षेत्रात हे लेखनाचे काम केले. महिलांच्या अल्पबचत गटातील उत्पादने ही दर्जेदार असतात. परंतु त्या मानाने त्यांना बाजारपेठा मिळत नाहीत. याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून संबंधित बचत गटांच्या विकास साठी शोध प्रबंध सादर केले आणि या पुस्तकाची इंग्रजी भाषेतून निर्मिती केली. जागतिक स्तरावर हे पुस्तक जाईल असा आम्हाला विश्वास आहे. माजी प्राध्यापक एस.टी.मुळे म्हणाले, शहाजी महाविद्यालयाला मोठी परंपरा आहे. लेखकांचे हे महाविद्यालय आहे. स्वयंरोजगाराचे मोठे साधन बचत गटांमधील महिलांना मिळाले आहे. उत्तम पद्धतीनी वस्तूंच्या निर्मिती करून त्या विविध बाजारपेठांमध्ये आणि प्रदर्शनांमध्ये त्यांची विक्री करतात. या महिलांनाही हे पुस्तक उपयुक्त आहे. ग्राहक, धोरणकर्ते आणि शासनकर्ते या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त आहे.
प्रा.एन.व्ही.हरूगडे म्हणाले, सह्याद्रीपासून मानदेशापर्यंत सर्वेक्षण करून डॉ. नूतन राऊत यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मार्केटिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून देणे आज बचत गटांना गरजेचे आहे. ग्राहकापासून ते उत्पादकांच्या पर्यंत हे पुस्तक उपयुक्त आहे.
प्रा. एस. पी. चौगुले,प्रा.विवेक पोरलेकर, सुहासिनी कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शहाजीयन विद्यार्थी मंडळाचे समन्वयक डॉ. एस.डी.रायजादे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.ए.बी.शेळके यांनी आभार मानले.
शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ डी. के. वळवी, ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील, डॉ. के. एम.देसाई, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते .
डॉ. नूतन राऊत यांच्या अल्पबचत गटाच्या मार्केटिंग पद्धती या पुस्तकाचे शहाजी महाविद्यालयात प्रकाशन
|