राजकीय
इचलकरंजीतील त्या फेरीवाल्यांना दिलासा!
By nisha patil - 10/10/2025 11:46:21 AM
Share This News:
इचलकरंजी -: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवतीर्थ ते गांधी प्रतिमा या परिसरात दरवर्षीप्रमाणे दिवाळी बाजार भरविण्याची परंपरा आहे. मात्र यंदा प्रशासनाने अचानक त्या ठिकाणी बाजार न लावण्याचा आदेश दिल्याने अनेक गरीब फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही परिस्थिती लक्षात घेत आमदार डॉ. राहुल आवडे साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देत फेरीवाल्यांची अडचण जाणून घेतली. त्यांनी प्रशासनाशी दूरध्वनीवर संपर्क साधून, सर्व सामाजिक आणि सुरक्षा नियमांचे पालन करून या पारंपरिक ठिकाणीच बाजार भरविण्यास परवानगी मिळवली.
या निर्णयामुळे फेरीवाल्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्वांनी आमदार डॉ. राहुल आवडे यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. दिवाळीपूर्वीच मिळालेला हा दिलासा फेरीवाल्यांसाठी ‘आर्थिक दीपोत्सव’ ठरला आहे.
इचलकरंजीतील त्या फेरीवाल्यांना दिलासा!
|