शैक्षणिक
सतेज पाटील यांच्या उपक्रमाचे डॉ. राजन गवस यांच्याकडून कौतुक"
By nisha patil - 6/14/2025 10:29:15 PM
Share This News:
सतेज पाटील यांच्या उपक्रमाचे डॉ. राजन गवस यांच्याकडून कौतुक"
कोल्हापूर (ता. १४): आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित शिक्षणासाठी आभाळाएवढी मदत; सतेज पाटील यांच्या उपक्रमाचे डॉ. राजन गवस यांच्याकडून कौतुक६ लाख वह्यांचे वाटप शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाले. हा उपक्रम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, "वही रूपी मदत ही आभाळाएवढी असून, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना हातभार लावणारी आहे."
विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, २००७ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत ६४ लाख ३७ हजार ७०० वह्या संकलित झाल्या असून १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या उपक्रमाची नोंद लिम्का आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.
यावेळी डॉ. गवस यांनी शिक्षणपद्धती, मोबाईल वापराचे दुष्परिणाम यावर परखड मत व्यक्त करत, "मोबाईलचा उपवास करा, मुलांना समर्थ बना," असे आवाहन केले.
कार्यक्रमाआधी अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतेज पाटील यांच्या उपक्रमाचे डॉ. राजन गवस यांच्याकडून कौतुक"
|