शैक्षणिक
कोरगांवकर हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By nisha patil - 4/14/2025 3:46:30 PM
Share This News:
कोरगांवकर हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ते प्रसाद रेळेकर आणि मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी अभिवादन करून मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भीमपरिचय नृत्यगीत सादर केले, तर भित्तीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. रमाई आणि बाबासाहेबांच्या वेषात विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमास शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरगांवकर हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
|