बातम्या
दाखला रद्द करून प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवावा आणि त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी कारवाई करण्यात यावी- कॉ.संग्राम सावंत
By nisha patil - 4/28/2026 4:37:59 PM
Share This News:
**दाखला रद्द करून प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवावा आणि त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी कारवाई करण्यात यावी- कॉ.संग्राम सावंत*
*आजरा(हसन तकीलदार)**:-संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने अत्यंत तातडीने अंमलबजावणी करण्यासाठीचे निवेदन उपविभागीय अधिकारीसो गडहिंग्लज संविधान संवर्धन चळवळ या संघटनेच्या वतीने आज देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
यासंदर्भात उत्तम कांबळेव सुभाष देसाई व इतर अनुसुचित जाती (SC) आरक्षण बचाव जनआंदोनल समिती जिल्हा कोल्हापूर आणि संग्राम सावंत मुख्य संघटक संविधान संवर्धन चळवळ, महाराष्ट्र यांच्या सोबत आपल्या कार्यालयातील दिनांक 07/04/2026 रोजीची बैठकीनुसार उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांनी या गोष्टी संबंधिताना कळविल्या होत्या. त्यामुळे महेश महादेव तुरबतमठ व गंगाधर राजशेखर हिरेमठ रा. गडहिंग्लज ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर, बेडा-जंगम अनुसूचित जातीच्या दाखल्याबाबत खुलासा सादर करणेबाबत नोटीस आपण उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज म्हणून प्रांताधिकारी कार्यालयकडून पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीस क्रमांक ई. ऑ. जातीचे दाखले. कावि/ 37 व 38/2026 दिनांक-07/04/2026 या नोटीसीला त्यांचे त्यांनी आपले म्हणणे सादर केले नसेल तर विहित मुदतीत आपला खुलासा प्राप्त झाला नसल्यास त्यांना याबाबात काहीही म्हणावयाचे नाही. असे गृहीत धरून त्यांचा दाखला रद्द केला पाहिजे तसेच याबाबतचा त्यांचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवावा आणि त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी कारवाई करण्यात यावी.
अत्यंत तातडीचे म्हणून आपण क्रमांक ई. ऑ. जातीचे दाखले कावि/८०/2026 दिनांक -09/04/ 2026 रोजी तहसीलदार गडहिंग्लज यांना विजया राजशेखर हिरेमठ यांना दिनांक ०२/११/१९८४ रोजीने जातीचा दाखला (क्र. ११९०/८४) निर्गमित करण्यात आला होता. त्या संदर्भात सन १९८४ मधील जातीच्या दाखल्याची मूळ संचिका (Original File) शोधून ती तातडीने मिळावी. म्हणून आपण पत्र देऊन सुद्धा ती संचिका मिळालेली नाही त्यामुळे याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
याबाबतचे उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांनी गंभीर दखल घेऊन कार्यवाहीची अंमलबजावणी केली नाही. तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे..
अत्यंत तातडीने अंमलबजावणी करण्यासाठीचे निवेदन उपविभागीय अधिकारीसो गडहिंग्लज यांना संविधान संवर्धन चळवळ संघटनेच्या वतीने आज देण्यात आले आहे. यावेळी दक्षिण मुख्य संघटक संविधान संवर्धन चळवळ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर विटेकरी,वसंत शेटके वआर.पी.आय.उपाध्यक्ष कृष्णा कांबळे कॉ.संग्राम सावंत (मुख्य संघटक संविधान संवर्धन चळवळ महाराष्ट्र ),ॲड.दशरथ दळवी, वसंत शेटके, दिगंबर विटेकरी, कृष्णा कांबळे,सुप्रिया देवेकर,संजय कांबळे, समीर खेडेकर, सचिन लोहार,अनिल सुतार,संतोष माने,भारती पवार, लक्ष्मी कांबळे, मजीद मुल्ला, अक्षय कांबळे,जयश्री कांबळे, सुरेखा पाथरवट आदिजण उपस्थित होते.
दाखला रद्द करून प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवावा आणि त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी कारवाई करण्यात यावी- कॉ.संग्राम सावंत
|