शैक्षणिक
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे डॉ संजय लठ्ठे यांची
By nisha patil - 7/6/2025 3:20:40 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे डॉ संजय लठ्ठे यांची
तुर्की विद्यापीठात अभ्यास दौऱ्यासाठी निवड
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय लठ्ठे यांची कोच युनिव्हर्सिटी, इस्तंबूल, तुर्की येथे एक महिन्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. डॉ लठ्ठे हे दि. २३ मे ते 21 जून २०२५ दरम्यान तेथील विद्यापीठात संशोधनाचे काम पार पाडतील. कोच विद्यापीठातील प्रा. लिव्हेंट देमिरेल यांच्या संशोधन प्रयोगशाळेत आपोआप स्वच्छ होणाऱ्या सोलर सेल पॅनल या विषयावर ते संशोधन करणार आहेत.
डॉ संजय लठ्ठे यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्रबंधक श्री. सचिन धनवडे तसेच यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे डॉ संजय लठ्ठे यांची
|