बातम्या

डॉ. संजय पाटील यांचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान

Dr Sanjay Patil honored with Maharashtra Gaurav award


By nisha patil - 8/23/2025 10:48:20 PM
Share This News:



डॉ. संजय पाटील यांचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान

मुंबई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या आणि उच्च शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘नवभारत’तर्फे आयोजित महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमास ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक वैभव माहेश्वरी, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र भारतात अग्रस्थानी आहे, मात्र उच्च शिक्षणासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण राज्यातच मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असेही त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र व उच्च शिक्षणातील योगदानाबद्दल डॉ. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सध्या ते डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ (कोल्हापूर), डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ (तळसंदे, कोल्हापूर) आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (आकुर्डी, पुणे) या विद्यापीठांचे कुलपती आहेत.

डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली के.जी. ते पी.जी. पर्यंत शिक्षण देणाऱ्या ४८ संस्था कार्यरत असून, ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी त्यातून शिक्षण घेत आहेत. मेडिकल, अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांत उच्च दर्जाचे शिक्षण देऊन राज्याच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.


डॉ. संजय पाटील यांचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान
Total Views: 130