शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचे महत्त्व या विषयावर डॉ.सुनिता दलवाई यांचे व्याख्यान संपन्न
By nisha patil - 11/10/2025 5:52:06 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचे महत्त्व या विषयावर डॉ.सुनिता दलवाई यांचे व्याख्यान संपन्न
कोल्हापूर11: सध्याच्या आधुनिक युगामध्ये कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये यश मिळविणेसाठी इंग्रजी भाषेचे कौशल्य किती महत्वाचे आहे, या विषयावर विवेकानंद कॉलेजमधील बी.एस्सी.कॉम्प्यूटर सायन्स (एंटायर) आणि इंग्रजी विभागाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सायबर कॉलेजमधील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ.सुनिता दलवाई यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्व सांगताना कौशल्ये कशी आत्मसात करावीत याबाबत मार्गदर्शन केले. या व्याख्यानात त्यांनी इंग्रजी ही एक भाषा नसून यशाची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले.
विविध कंपन्यांमध्ये काम करीत असताना संवाद साधण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणेसाठी इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.माधुरी पवार यांनी केले तर स्वागत बी.एस्सी.कॉम्प्यूटर सायन्स (एंटायर) विभागप्रमुख प्रा.पल्लवी देसाई यांनी केले. आभार प्रदर्शन कु.भूमी चौगुले हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्वेता पाटील आणि कु.संकेत पाटील यांनी केले . संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले .
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ.कविता तिवडे, डॉ.श्रृती जोशी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी कार्यालयीन रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे तसेच प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचे महत्त्व या विषयावर डॉ.सुनिता दलवाई यांचे व्याख्यान संपन्न
|