विशेष बातम्या

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान... 

Dr Varsha Patil of Siddhagiri Janani honored for her selfless medical service


By nisha patil - 5/30/2025 10:27:35 PM
Share This News:



निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान... 

कोल्हापूर शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपन्न झाला. 

यावेळी वंध्यत्व निवारणासाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनानुसार अमूल्य व भरीव असे कार्य कोणतेही मानधन न घेता करणाऱ्या सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा विवेकराव पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, रानू महाराज वास्कर, मा. आमदार सुजित मिणचेकर, डॉ ज्योति वाघमारे, सुजित चव्हाण यांच्या हस्ते  विशेष सन्मान करण्यात आला.  वंध्यत्व निवारणासाठी त्यांनी  स्वामीजींच्या प्रेरणेने भारतातील पहिले ट्रस्ट श्रेणीतील आय व्ही एफ टेस्ट ट्युब बेबी सेंटर कार्यान्वित केल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे वात्सल्य सुखा पासून वंचित राहू नये यासाठी डॉ. वर्षा पाटील ह्या विशेष परिश्रम घेत आहेत. अत्यंत माफक दरात त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य  नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. डॉ. वर्षा  पाटील यांनी दिलेल्या विनामोबदला सेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरला आहे.

 या कार्यक्रमास मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, रामहरी राऊत व पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील  नामांकित डॉक्टर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान... 
Total Views: 107